जेऊर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी नंबर दोन येथे नूतन पंचायत समिती सदस्या सौ. सोनाली नितीन तकिक यांनी माता पालकांसह शाळेला भेट दिली.
यावेळी त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व वर्गात भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली विशेषतः इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गाची कसून तपासणी केली.
वर्गशिक्षिका श्रीम. आदलिंगे मॅडम आणि मुलानी मॅडम यांचे कौतुक केले.
सर्व वर्गांची गुणवत्ता तपासली आणि समाधान व्यक्त केले.
सुंदर हस्ताक्षर उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारणा पाहून कौतुक केले.
शाळेच्या सर्व उपक्रमाचे त्यांनी अवलोकन केले त्यांच्या सोबत असलेल्या सर्व माता यांनीही गुणवत्ता पाहिली आणि मराठी शाळेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी गुढी पाडवा, पट वाढवा उपक्रमात सहभागी होऊन नवागतांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी तकिक मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षकांचा सत्कार त्यांनी केला. त्याचबरोबर शाळेच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
शालेय पोषण आहार आणि पूरक पोषण आहार यांची सविस्तर माहिती घेतली तसेच विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी यशस्वी होत आहे हे पाहून समाधान व्यक्त केले.
. शाळेच्या काही अडचणी व गरजा जाणून घेतल्या आणि पंचायत समिती मार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शाळेचा पट वाढविण्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
शेवटी मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.





















