सांगोला – विद्यामंदिर ज्यु.कॉलेज येथे इ.११ वीची पालक-शिक्षक सहविचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपीठावर सभेचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, प्रा.शिवशंकर तटाळे, प्रा.इसाक मुल्ला, प्रा.दिलीप मस्के उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रा.शिवशंकर तटाळे यांनी सभेचा हेतू स्पष्ट केला.
विद्यार्थ्यांचा वेळ वाया न घालवता आम्ही एप्रिल महिन्यापासूनच १२ वीचे तास सुरू करत आहोत. पालकांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या पाल्याला उन्हाळी सुट्टीत अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे. ११ वीच्या परीक्षेतील जिद्द आणि १२ वीची वेळेत होणारी सुरुवातच आपल्याला यशाच्या शिखरावर नेईल असे मनोगत प्रकाश म्हमाणे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा.इसाक मुल्ला, प्रा.जालिंदर मिसाळ, प्रा.राजेंद्र कुंभार, प्रा.गणेश घेरडीकर यांनी शाखानिहाय अभ्यासक्रमा विषयी माहिती दिली. याप्रसंगी पालकांनी या सभेच्या आयोजनाबद्दल व बारावीच्या पूर्वतयारीसाठी केलेल्या उपाययोजनेसाठी समाधान व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा.आरती वेदपाठक यांनी केले. आभार प्रा.निलेश नागणे यांनी मानले.





















