जेऊर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजेची विद्यार्थिनी अन्वी संजय गर्जे हिची नवोदय विद्यालय सोलापूर (पोखरापूर )येथे निवड .ही परीक्षा 13 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती त्यात तिला 97.50% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता तिने हे यश संपादन केले आहे.तिचे वडील व शिक्षक श्री संजय गर्जे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले व तिची मोठी बहीण आदिती संजय गरजे तिचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले ती नवोदय विद्यालय पोखरापूर येथे शिक्षण घेत आहे. या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री कदम साहेब व विस्तार अधिकारी माननीय श्री टकले साहेब तसेच करंजी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री मुंडे सर यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या यशासाठी तिला मुख्याध्यापक श्री अमोल राऊत सर तसेच तिचे वर्गशिक्षक श्री गरड सर, शिंदे सर, घोगरे सर,कांबळे मॅडम ,रासकर मॅडम आदींचे देखील मार्गदर्शन लाभले, या सर्वांनी देखील तिचे या यशाबद्दल भरभरून कौतुक केले.























