वेळापूर – महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ या स्पर्धेमुळे महिलांना आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे जिंकावीत, असे प्रतिपादन वेळापूर ग्रामपंचायत सदस्या डॉ. सौ. स्नेहलताई जानकर यांनी केले.
वेळापूर येथील आराध्य दैवत अर्धनारी नटेश्वर यात्रेनिमित्त आमदार उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारतळ, वेळापूर येथे यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्या विमलताई जानकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. मीनाक्षी मिलिंद सरतापे, रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, दीपकआबा राऊत, अमृतराव माने देशमुख, रविराज गायकवाड,हनुमंत वायदंडे, सौ. सीमा खाडे, सौ. प्रियांका आडत, रहीम मुलाणी, यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ आडत, उपाध्यक्ष अॅड. विठ्ठल मंडले, उपाध्यक्ष रणजीत साठे, कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सरचिटणीस विनायक भगत, सचिव अभिजीत साठे, सेक्रेटरी विजय पवार, सदस्य मनोहर माने तसेच शंकर आडत, धनंजय शिवपुजे, रणजीत सरवदे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा अर्धनारी नटेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विठ्ठल मदने यांनी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेबाबत माहिती दिली. सायंकाळी महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांमध्ये सौ. वैशाली मेहरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत एलईडी टीव्ही व मानाची पैठणी मिळवली. सौ. पूजा सुतार यांनी द्वितीय क्रमांक मिळवत मिक्सर व मानाची पैठणी जिंकली, तर सौ. चांदणी घाडगे यांनी तृतीय क्रमांक पटकावत कुलर व मानाची पैठणी प्राप्त केली. तसेच सौ. रूपाली परशेट्टी, सौ. मनीषा म्हसवडे, सौ. मंजुषा भोसले, सौ. शितल बनसोडे, सौ. शिवानी सुतार, सौ. प्रियंका आडत व सौ. वैशाली पिसे यांनी मानाच्या पैठण्या जिंकल्या.
विजेत्या स्पर्धकांना पं. स. सदस्या विमलताई जानकर, जि. प. सदस्या मीनाक्षी मिलिंद सरतापे, डॉ. सौ. स्नेहलताई जानकर, सौ. अनिता रजनीश बनसोडे, सौ. प्रियंका आडत व सौ. सीमा खाडे यांच्या हस्ते बक्षिसे व मानाच्या पैठण्या देऊन गौरविण्यात आले. होम मिनिस्टर च्या कार्यक्रमाल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल मदने व रणजीत सरवदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेळापूर ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


















