सोलापूर – क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे तात्या लांडगे यांची तर सरचिटणीस रजनीकांत उपलंची, ( जनदर्पण न्यूज चॅनेल ) यांची निवड करण्यात आली.
सोलापूर दैनिक क्राईम रिपोर्टर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दै. सुराज्यचे अखलाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दैनिक संचारचे अनिल कदम, दै. जनसत्यचे अरुण रोटे, दै. तरुण भारत संवादचे अमोल व्यवहारे, दैनिक पुण्यनगरीचे भरतकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दी. रविवार दी.५ एप्रिल रोजी पार पडलेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड एक वर्षासाठी करण्यात आली.
ही आहेत नूतन पदाधिकाऱ्यांची नावे –
उपाध्यक्ष मुन्ना शेख, खजिनदार रूपेश हेळवे (दैनिक लोकमत), सहचिटणीस इरफान शेख (महाराष्ट्र टाइम्स).
कार्यकारिणी सदस्य : मुज्जमिल शहानुरकर, मुकुंद उकरंडे, रोहन नंदाने, रत्नदीप सोनवणे, परशुराम कोकणे.
सल्लागार – अखलाक शेख, अनिल कदम, संजय जाधव, अरुण रोटे, सरदार आत्तार, विलास जळकोटकर, अमोल व्यवहारे, धनंजय मोरे, विनायक होटकर, विजयकुमार राजापुरे, भरतकुमार मोरे.






















