मोहोळ – मतदार यादी पुनर्निरीक्षण म्हणजे एसआयआर मोहोळ विधानसभा प्रमुख पदी भाजपचे जिल्हा चिटणीस मोहोळचे महेश विलास सोवनी यांची निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी त्यांना दिले आहे.
राज्यात एसआयआर ची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये २००२ आणि २०२४ च्या मतदार यादीतील नावांचे मॅपिंग करणे, सर्व नांवे पुन्हा येतील असा प्रयत्न करणे, आणि ज्यांची नांवे नसतील त्यांचे योग्य पुरावे घेऊन नव्या मतदार यादीत त्यांची नावे घालणे,नावात दुरुस्ती, फोटो आणि पत्ता बदल आदि कामे प्रामुख्याने केली जात आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने प्रत्येक बूथवर म्हणजे यादी भाग क्रमांकासाठी एका शासकीयकर्मचाऱ्याची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे . त्याला मदत करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या वतीने एका कार्यकर्त्याची प्रत्येक बूथवर नियुक्ती करायची आहे.
भाजपच्या वतीने ही नियुक्ती करण्याचे अधिकार महेश सोवनी यांना पक्षाने दिले आहेत. या निवडीबद्दल माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, दोन्ही मंडल अध्यक्ष सतीश काळे आणि रमेश माने, माजी जिल्हा सहसंयोजक अविनाश पांढरे, मच्छिंद्र गाडे-पाटील, ज्ञानेश्वर भोसले,आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
एसआयआर मुळे मतदार यादी अधिक पारदर्शक होणार असून प्रत्येक मतदाराने आपापल्या भागाच्या बीएलओ संपर्क साधण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.

























