Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यशस्वी वाटचालीवर लेखा परीक्षणातून शिक्कामोर्तब; एकूण व्यवसाय २५ कोटींच्या पुढे

तरुण भारतbyतरुण भारत
April 11, 2026
in editor
0
यशस्वी वाटचालीवर लेखा परीक्षणातून शिक्कामोर्तब; एकूण व्यवसाय २५ कोटींच्या पुढे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे : देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्जीय सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील १५ वर्षांप्रमाणे यंदाही दिनांक १० एप्रिल रोजी लेखा परिक्षित निकाल जाहीर करण्याची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे.


एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत बँकेने आपल्या ५४व्या वर्षात एकूण व्यवसायाचे ₹२५,००० कोटींचे उद्दिष्ट पार केले आहे. तसेच, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन नवीन राज्यांमध्ये विस्तार करून बहुराज्जीय सहकारी बँक म्हणून आपली स्थिती अधिक भक्कम केली आहे. वर्षभरात नवीन शाखा सुरू करणे आणि धोरणात्मक विलीनीकरणांमुळे बँकेच्या एकूण शाखांची संख्या आता १६५ झालेली आहे.


आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेचा एकूण व्यवसाय ₹२५,३६० कोटी इतका नोंदविण्यात आला असून, यात ११६, २४४ कोटी ठेवी आणि १९,११६ कोटी कर्ज वाटपाचा समावेश आहे. बँकेने ₹२८७ कोटींचा एकूण नफा तर ५१५५ कोटींचा निव्वळ नफा नोंदविला आहे.
बँकेची एकूण अनुत्पादित कर्जे ३.११% तर निव्वळ अनुत्पादित कर्जे ०% इतकी आहेत, हे बँकेच्या शिस्तबद्ध कर्ज व्यवस्थापन आणि प्रभावी वसूली व्यवस्थेचे यश आहे.


पत्रकार परिषदेत अध्यक्ष श्री. शरद गांगल म्हणाले, ₹२५,००० कोटींच्या एकूण व्यवसाय टप्पा ओलांडणे हे टीजेएसबी बँकेसाठी अभिमानास्पद आहे. बँकेची ही प्रगती ग्राहकांच्या विश्वासासह योजनाबद्ध विस्ताराच्या धोरणाचे द्योतक आहे. आम्ही शाश्वत वाढ आणि पारदर्शी, कार्यक्षम प्रशासकीय कामकाजासाठी कटिबद्ध आहोत; असेही अध्यक्ष श्री. शरद गांगल यांनी सांगितले.
उपाध्यक्ष सीए श्री. वैभव सिंगवी म्हणाले, या वर्षातील आमची आर्थिक कामगिरी सातत्य आणि संतुलन दर्शविते. भक्कम भांडवली पर्याप्तता आणि स्थिर मालमत्ता गुणवत्ता याच्या आधारे हे साध्य झाले आहे. व्यावसायिक जोखीम व्यवस्थापनाची शिस्त पाळली आहे. बँकेच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांचा विश्वास टिकवून तो वृद्धिंगत केला आहे.


व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल आरेकर यांनी सांगितले, “या वर्षी बँकेने ₹२५,००० कोटींच्या एकूण व्यवसायाचा आकडा पार करून एक महत्त्वपूर्ण व्यवसायिक टप्पा गाठला आहे. यातून आमच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि सशक्त वाटचालीचे दर्शन घडते. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या दोन राज्यात प्रवेश, नवीन शाखांतुन विस्तार आणि सिटीझन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोवा आणि सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या दोन बँकांचे विलिनीकरण यातून बँकेचा विकासाचा आणि विस्ताराचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो.

आर्थिक वर्षातील प्रमुख कामगिरी
* फेब्रुवारी २०२५ मध्ये सिटीझन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोवा आणि मे २०२५ मध्ये सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचे विलीनीकरण
* विलीनीकरणानंतर अवघ्या एका वर्षात नवीन समाविष्ट शाखा नफ्यात येण्यास सुरुवात झाली, ज्यामुळे कोकण आणि गोवा विभागातील बँकेची स्थिती अधिक सक्षम झाली आहे.
* सहकारी क्षेत्रातील पहिली बँक म्हणून “bank.in” या बँकिंग डोमेनवर संकेतस्थळ यशस्वीपणे स्थलांतरित केले
* देशातील पहिली UPI-ICD (आंतरकार्यक्षम रोख ठेवी) स्वीकारणारी बँक म्हणून कार्यान्वित
* राजस्थान आणि छत्तीसगड या दोन नवीन राज्यांमध्ये प्रवेश
* ७ नवीन शाखांची वाढ; एकूण शाखा संख्या १६५
*  ₹२५,००० कोटी एकूण व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला

टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड विषयी
१९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड ही महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या सात राज्यांमध्ये समर्थपणे कार्यरत असलेली अग्रगण्य बहुराज्जीय बँक आहे. ग्राहककेंद्रित सेवा, पारदर्शक आर्थिक सेवा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न यासाठी बँक ओळखली जाते.
बँकेच्या सक्षम आणि व्यापक वितरण व्यवस्थे मुळे तसेच third party आर्थिक उत्पादने व सेवा ग्राहकांना विक्री करण्यातील अनुभवामुळे, विमा सेवा सर्वस्तरात उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रभावी माध्यम ठरली आहे.


पाच दशकांहून अधिक कालावधीतील सेवा कुशलतेने बँक देशभर क्रमाक्रमाने विस्तार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा विस्तार, ग्राहक हितासाठी सुरक्षेला प्राधान्य आणि आणि कार्यक्षमतेत अचूकता यावर विशेष लक्ष देत आहे.

Post Views: 43
Previous Post

एसआयआर मोहोळ विधानसभा प्रमुख पदी महेश सोवनी

Next Post

हिंदुस्तान फीड्स तर्फे सांगोला विद्यामंदिर मध्ये सॅनिटरी पॅड्सचे वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हिंदुस्तान फीड्स तर्फे सांगोला विद्यामंदिर मध्ये सॅनिटरी पॅड्सचे वाटप

हिंदुस्तान फीड्स तर्फे सांगोला विद्यामंदिर मध्ये सॅनिटरी पॅड्सचे वाटप

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त फडणवीस यांनी घेतले संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळ्याचे दर्शन TBN #viral #solapurnews

July 23, 2026

वेळेत तक्रारी अर्ज निकाली न काढणारा ४१ अधिकाऱ्यांना २८ हजारांचा दंड TBN #viral #solapurnews

July 23, 2026

सोलापूरचे आयटी पार्क होटगी मध्येच होणार #viral #marathinews #solapurnews

July 23, 2026

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ज्ञानभारतचे काम सुरू #viral #maharashtranews

July 23, 2026

वाढदिवसदिनी व्हिडीओ कॉलने कल्याणशेट्टींनी स्वामींची भेट घडविली TBN #viral

July 23, 2026

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मोर्चासाठी मोठ्या संख्येने या……

July 23, 2026

जनाधार फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात ४५६ जणांनी केले रक्तदान……

July 23, 2026

शिवसेना ठाकरे पक्षाने 56 समस्यांचे फलक लावून कट केला केक……

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0993625

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!