माळशिरस – खुडूस ता माळशिरस येथे एस.टी. बस थांबा असताना देखील काही एसटी बसेस ओव्हर ब्रिज वरून जात असल्यामुळे विदयार्थांसह नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांनी पुलावर बस थांबविण्याचा प्रयत्न केला तरी नागरिकांना न जुमानता बस चालक बस थांबवता बस पुढे घेऊन जात असल्याने विद्यार्थ्यासह नाग्रीकातून संताप व्यक्त होत आहे.अश्या बस चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खुडूस गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या आसपास असून अनेक वाडया वस्त्यांशी निगडित आहे त्यामुळे बस थांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. शिवाय शालेय विदयार्थांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .खुडूस येथून नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस येथे अनेक विदयार्थी शाळा, कॉलेजसाठी जातात. परंतु सकाळी वेळेवर येणाऱ्या गाडया सर्विस रोड वरती असणाऱ्या बस थांब्यावरून जात नसल्याने विदयार्थांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे.तसेच नागरिकांना हि नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या बसेस लांब पल्ल्याच्या आहेत त्यांना वाहतूक नियंत्रकांनी सांगूनही काही बसेस ओव्हर ब्रिज वरूनच जातात .त्यामुळे शाळा ,कॉलेजला वेळेत जाणे अवघड झाले आहे.आज दिनांक १० रोजी सकाळी पंढरपूर विठ्ठलवाडी बस ओव्हर ब्रिज वरून जात असल्याची पाहून काही नागरिकांनी पुलावर जाऊन थांबविण्याची विनंती केली परंतु चालकाने नागरिकांना न जुमानता बस न थांबवता नेली.अश्या लांबपल्ल्याच्या बस थांबत नाहीत . सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत.या बसेस या बस थांब्यावर न येता ओव्हर ब्रिज वरून गेल्यास विद्यार्थ्यांचे परीक्षाला वेळेत न पोहचने मुश्कील होत आहे.
चौकट ….
याबाबत माळशिरस वाहतूक नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही चालकांना सूचना देत आहे तसेच त्यांच्या लॉग शीट वरही खुडूस बस थांब्यावर बस थांबवावेत असा शिक्का मारून देत आहे
पांडुरंग कटके, माळशिरस वाहतूक नियंत्रक .
परीक्षा सुरु झाली असून बसेस न थांबल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .याबाबत बस न बस थांब्यावरून न नेणाऱ्या बस चालकांवर कारवाई करावी
कल्याण मोटे,नागरिक खुडूस
एस टी चे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’असे असले तरी याचा प्रत्यय मात्र खुडूस नागरिकांना येताना दिसून येत नाही .बस चालक आपली मनमानी करताना दिसून येत आहेत.आम्ही खुडूस ग्रामस्थांनी पुणे पंढरपूर मार्गावरील खाजगी वाहतूक अनेक वर्षापासून बंद केली त्यामुळे आम्हाला बस शिवाय पर्याय नाही परंतु बस थांबत नसल्याने गैरसोय होत आहे.
रमेश बनकर ,खुडूस
























