सोलापूर – प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता. सत्यशोधक, राष्ट्रपिता, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त पी.बी ग्रुपचे माजी अध्यक्ष धनंजय कापुरे व नूतन अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, भारत बाबरे, चंद्रकांत सोनवणे, संजय इंगळे, भैय्या कापुरे, अमित माने, सोशल बँकेचे कर्मचारी मोबीन पठाण, रौफ शेख, सुलतान पटेल. सुरज वाघमोडे, धोंडीबा कापुरे, विकी माळाळे, गौतम शिंदे, प्रसन्न तळभंडारे, दैवशील गायकवाड, आदर्श कापुरे, प्रतीक चंदनशिवे तसेच पी.बी. ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





















