बार्शी – महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे’च्या डिजिटल विंग अंतर्गत कार्यरत असलेल्या डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचा बार्शी तालुका व शहर पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात संघटनेच्या विस्तारावर भर देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. शहर अध्यक्षपदी गणेश शिंदे यांच्याकडे, तर ग्रामीण अध्यक्षपदाची संतोष कानगुडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा (पश्चिम) कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष विनोद ननवरे, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव संजय बोकेफोडे, सहसचिव बाबासाहेब शिंदे आणि खजिनदार अजय पाटील यांचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानाचे फेटे बांधून, पुष्पगुच्छ आणि अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली
शहरातील डिजिटल पत्रकारितेला अधिक सक्षम करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष- गणेश शिंदे, उपाध्यक्ष- अभिजीत शिंदे, सचिव- निलेश उबाळे, सहसचिव: अमीन गोरे, खजिनदार- समाधान विधाते. सदस्य- स्वप्निल पोफळे, सचिन साळवे, संदीप सुतार. मार्गदर्शक: रमेश गायकवाड, रमण कारंजकर. कायदेशीर सल्लागार- ऍड. शंकर ननवरे.
ग्रामीण भागातील प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्ष- संतोष कानगुडे, उपाध्यक्ष- काशिनाथ क्षीसागर, सचिव- विश्वनाथ सोनवणे, सहसचिव- राजेश भोगे, खजिनदार- बालाजी देवकते. सदस्य- शांतीलाल काशीद, अर्जुन गोडगे. महिला आघाडी प्रमुख- राजश्री गवळी यांची संघटनेच्या महिला सक्षमीकरणासाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी मार्गदर्शन केले, तर उपस्थितांनी पत्रकारिता क्षेत्रातील आव्हानांवर आपली मते मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश उबाळे यांनी तर आभार अभिजीत शिंदे यांनी मानले.























