पंढरपूर – विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जयंती महोत्सव समिती पंढरपूर यांच्यावतीने वतीने पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील पत्रकार चंद्रकांत माने यांना विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार सोहळ्याचे वितरण मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथे आमदार समाधान आवताडे,आमदार अभिजीत पाटील, आमदार राजु खरे,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे,भगीरथ भालके,अनिल सावंत, मनसेचे दिलीप धोत्रे,पंचायत समिती सभापती शुभम आगावणे, नागेश भोसले,जयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.राज सर्वगोड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
























