करमाळा – श्रीकमलादेवी मंदिर येथील श्रीमहादेव मंदिर येथे पितळी पंचमुखी नाग फणी सोमवार दिनांक १३ एप्रिल२०२६. रोजी अविनाश राठोड. रा.करमाळा यांनी त्यांचे वडील कै.जवाहरलाल रूपचंद राठोड यांच्या स्मरणार्थ अर्पण केलेली आहे.
या निमित्त त्यांचा सत्कार महादेव मंदिर पुजारी ईश्वर पवार अशोक गाठे व्यवस्थापक यांनी केला आहे . या वेळी सर्व भक्त गण उपस्थित होते. श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे .
तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे .
























