सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३५ व्या जयंतीनिमित्त भिम प्रतिष्ठान अंतर्गत घेण्यात येणारा एक नावीन्यपूर्ण उपक्रम भेट संविधानाची या उपक्रमांतर्गत संविधानाच्या उद्देशिकाची फोटो फ्रेम सोलापूर बार असोसिएशन सोलापूर यांना भेट देण्यात आली. या उपक्रमातून संविधानाचे महत्त्व आणि उद्देश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करीत आहोत.
याप्रसंगी भीम प्रतिष्ठानच्या संस्थापक दलितमित्र. बाबा बाबरे यांच्या हस्ते बार असोशियन यांचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांना संविधानाची उद्देशिका फोटो फ्रेम भेट देण्यात आली , यावेळी ज्येष्ठ वकील ॲड. संजीव सदाफुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधीमंडचे अध्यक्ष ॲड. शताब्दीकुमार दोड्यानुर , कार्याध्यक्ष ॲड. रविराज सरवदे , भीम प्रतिष्ठानच्या सचिव अकबर शेख, कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे आदी मान्यवर उपस्थित होते.


























