अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी रचित आलोक फडे याने मंथन सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यात तिसरा व राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
या यशाबद्दल प्रशालेच्या मार्गदर्शिका सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील, सभापती कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.या वेळी प्रताप क्रीडा मंडळाचे माजी खजिनदार व रचितचे आजोबा विजय दोशी, रचितच्या आई नेहा फडे उपस्थित होते.
मंथन ही जनरल नॉलेजची परीक्षा राज्य पातळीवर होऊन ती १५० गुणांची होती. रचित फडे याने १३६ गुण मिळवून जिल्ह्यात तिसरा व राज्य पातळीवर आठव्या क्रमाने उत्तीर्ण होऊन स्पर्धेत बाजी मारली. या यशा बद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सर्व संचालक मंडळ, स्थानिक प्रशाला समिती सर्व सदस्या, मुख्याध्यापिका नुरजहाॅ शेख यांनी रचित फडे व पालकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सोबत फोटो..
फोटोओळी..
रचित फडे याचा सत्कार करताना सुलक्षणादेवी मोहिते पाटील , स्वरुपाराणी मोहिते पाटील,विजय दोशी,नेहा फडे.


























