पंढरपूर – राजमाता जिजामाता उद्यानाचे बेकायदेशीर उद्घाटन झाले आहे. याबाबत आपण शहर पोलीस ठाण्यात क्रार दाखल दाखल केली आहे. तसेच नाना असते तर तुम्ही आमदार झालाच नसता असा आमदार समाधान आवताडे यांना टोला लागावून महिलांना अश्लिल भाषा बोलणे ही आवताडे कुटुंबाच्या परिवाराचेच संस्कार आहेत असाही आरोप नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांनी केला.
जिजामाता उद्यानाच्या उदघाटना वरुन करण्यात आलेल्या टिकाटिप्पणीनां उत्तर देण्यासाठी नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी बुधवारी (दि.२२) येथे पत्रकार परिषदेचे आयेजन केले हाते. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदारआवताडे यांनी केलेल्या टिकेला उत्तर दिले. यावेळी संजय बंदपट्टे, सुधीर धोत्रे,ओंकार जोशी आदी प्रमुख उपस्थितीत होते.पंढरपूर शहरा च्या सौंदर्यात भर पडावी, लहान मुलांनाखेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरण्यासाठी नगरपरिषदेने जिजामाता उद्यान तयार केले आहे. मात्र याचे घाईगडबडीने बेकायदेशीर उद्घाटन करण्यात आले. याबाबत आपण पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे असे नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी सांगितले.
उद्यानात अनेक गैरसोयी आहेत. भ्रष्टाचार लपविण्यासाठीच घाईगडबडीत उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र उद्याना मध्ये पिण्याचे पाणी शौचालय व सुरक्षा रक्षक नाहीत. यामुळे उद्याना मध्ये येणार्या लहान मुले, महिला व नागरिकांची गैरसोय होणार आहे. यामुळे उद्याना मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालके यांनी सांगितले.
———————
( मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार )
एका महिलेचा अवमान आमदार समाधानआवताडे यांनी केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे तक्रारदाखल करणार असल्याचे नगराध्यक्षा भालके यांनी सांगितले.
———————–
( नाना असते तर तुम्ही आमदार झालाच नसता )
उद्घाटन कार्यक्रमात आमदार समाधानआवताडे म्हणाले होते की, नगराध्यक्षां यांचे वागणे वेगळ्या प्रकारचे आहे. यामुळे नानाअसते तर त्यांनी त्यांना घराबाहेर काढले असते. या प्रश्नाचे नगराध्यक्ष भालकेयांनी सडेतोड उत्तर देत जर भारतनाना भालके असते तर तुम्ही आमदारझाला नसता असेम्हणून डॉ. प्रणिता भालके यांनी खिल्ली
———————–
(शेजार्याला टक्केवारी देवूनच
ते आमदार झालेले आहेत )
आमदार समाधान आवताडे यांनी टक्
केवारीमिळाली नसल्यामुळे विरोधकांकडून उद्घाटनाला विरोध होत असल्याची टीका करण्यातआलेली होती. त्यांच्या या टिकेचा खरपूस समावार घेऊन नगराध्यक्ष डॉ.प्रणिता भालकेम्हणाल्या, आमदार समाधान आवताडे ठेकेदार आहेत. त्यामुळे त्यांना किती टक्के घ्यावयाचे याची जास्त माहिती आहे. या बरोबरच शेजार्याला टक्केवारी देवूनच तेआमदार झालेले आहेत असेही त्यांनी सांगितले.
—————–
राष्ट्रमाता जिजामाता उद्याना संदर्भात तक्रारी आल्या आहेत. याबाबत आपण पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया कडून तपासणी किंवा थर्डपार्टी ऑडिट करणार आहोत. निकृष्ट दर्जाचे कामआढळले तर कारवाई करण्यात येईल. या बरोबरच उद्याना मध्ये वॉशरूम, बॉचमन ठेवण्यात येईल.
महेश रोकडे ( मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका )






















