सोलापूर : सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये वर्षभर 100 टक्के उपस्थिती राखणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चालू शैक्षणिक वर्षातील तब्बल 101 विद्यार्थ्यांना 100% उपस्थिती बाबत सन्मान चिन्ह,सन्मानपत्र व भेटू वस्तू देऊन गोरविण्यात आले.
शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर व परिवाराच्या वतीने सर्व 101 विद्यार्थ्यांना भेटू वस्तू देण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजुसा भुमकर यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे,शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल,संस्थेचे सदस्य सुरेशसा बिद्री,शिरीषसा कोल्हापुरे,गणेशसा दामजी,शैक्षणिक संस्थेचे सदस्य श्री तुकारामसा पवार,प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने,इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार,माध्यमिक विभागाच्या सविता हातवळणेआदिची उपस्थिती लाभली होती.
वर्षभर एकही दिवस गैरहजर न राहता शाळेत हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व यादी वाचन सहशिक्षक अनिल गायकवाड यांनी केले तर आभार सहशिक्षक महेश काळे यांनी मानले.




















