पंढरपूर – तालुक्यातील मौजे कान्हापुरी येथील श्री भैरवनाथ विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा कान्हापुरी येथे आज निर्भया पथक पंढरपूर प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया रावण (यादव ) यांनी विद्यालयातील मुलामुलींना अतिशय प्रभावी अन् प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विशेषतः मुलींना त्यांनी मौलिक व उपयुक्त मार्गदर्शन करत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आणि कोणतेही परिस्थितीला न घाबरता ठामपणे पुढे जाण्याचे धैर्य ठेवण्याचे संदेश दिले.
यावेळी पथकातील मपोका वाघमारे, पोका कुचेकर,पो.ह. सावंत, पोका टिंगरे यांनी मुलांना विविध विषयावर मार्गदर्शन करून निर्भयाचे टोल फ्री नंबर समजून सांगून निर्भया नेहमी तुमच्या साठी तत्पर मदतीस धाऊन येईल याची ग्वाही देण्यात आली. यावेळी त्यांचे व त्यांच्या टीमचे भाषण अतिशय सुंदर व प्रेरणादायी तसेच विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श करणारे होते अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवी दिशा व सकारात्मक ऊर्जा मिळाली.
विद्यालयाच्या वतीने पीएसआय यादव मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण निर्भया पथक टीमचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
—————-
जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलीना स्वरक्षणाचे धडे,आत्मनिर्भर,तसेच मुलीनी खेड्यातून आहे म्हणून न्यूनगंड न बाळगता धाडसाने यशाचे शिखर गाठले पाहिजे असे मार्गदर्शन,निर्भया पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया यादव रावण यांनी केले.





















