कळंब – प्राथमिक शिक्षण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा साळेगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत तुकाराम काळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळयाचे आयोजन येत्या शनिवारी (दि.२५) करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा होणार आहे.
गेल्या ३५ वर्षापासून सुर्यकांत काळे हे जिल्हा परिषदतंर्गत कार्यरत आहेत. त्यांच्या सेवापूतीनिमित्त येत्या शनिवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता निसर्ग मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे. केजचे गटशिक्षणधिकारी सुनील केंद्रे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. हभप प्रकाश बोधले महाराज, गणेश जोगदंड महाराज यांचे शुभाशीर्वाद या सोहळ्यास लाभणार आहेत.
या कार्यक्रमास आ.कैलास पाटील, माजी मा.राजेंद्र राऊत, अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, माजी आ.संगीता ठोबरे, माजी आ.पृथ्वीराज साठे, आरोग्य संचालक डॉ.अशोक थोरात, सोलापूर जि.प.अध्यक्ष दीपक वैद्य, सभापती अंकुशराव इंगळे, माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, माजी पंस सभापती राजेसाहेब देशमुख, ज्ञानेश्वर चवरे, संजय पाटील, अनुराधा नखाते, सीता बनसोड, हारुण इनामदार, सादिक इनामदार, नबाब इमाम, डॉ.देवेंद्र डोके भिमराव साठे, बालासाहेब बोराडे, बालासाहेब जाधव, बाळकृष्ण भवर, भगवान केदार, गुणवंत पवार, सरपंच कैलास पाटील, भालचंद्र गिते, सविता सरवदे, नारायण लांडगे, ’छावा’चे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. यावेळी सूर्यकांत व सुरेखा काळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन साळेगाव ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व मित्र परिवाराच्यावतीने करण्यत आले आहे.

















