कुर्डूवाडी – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी शशिकांत कांबळे यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा म्हैसगाव येथील जब्बार महाजन यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केलेला आहे .
म्हैसगाव तालुका माढा येथील मूळ रहिवासी असलेले शशिकांत आप्पा कांबळे हे कल्याण डोंबिवली येथे काही वर्षांपूर्वी कामा निमित्त गेले होते तेथे त्यांनीच तेथे त्यांनी आपल्या कामाचे बस्तान बसवले व जनसंपर्क वाढवला या जनसंपर्काच्या जोरावरती त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवक पदाची उमेदवारी दिली व ते प्रचंड मताने विजयी झालेले आहेत .
कल्याण डोंबिवली येथे नगरसेवकाच्या झालेल्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशी नुसार व नगरसेवकांनी केलेल्या मागणी नुसार सुहास कांबळे यांची महापालिकेत भाजपच्या नगरसेवकाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे .
तसेच नुकतीच त्यांची नवी मुंबई महापालिकेच्या भाजपच्या पक्ष निरीक्षक पदी निवड करण्यात आलेली आहे . यानिमित्त म्हैसगाव येथील त्यांचे बालपणाचे मित्र जब्बार शेठ महाजन यांनी त्यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जाऊन सत्कार केलेला आहे . यावेळी त्यांच्या सोबत समीर कोरबू दादा पटेल उपस्थित होते .
कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपचे गटनेतील सुहास कांबळे यांचा सत्कार करताना जब्बार महाजन


















