पंढरपूर – येथील भीमानदी मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले असूनपंढरपूर शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनीउजनी कालव्यातील गादेगाव येथून पाणी बंधाऱ्यात सोडण्याचीव्यवस्था करून शहराचा पाणीप्रश्न तात्पुरता मार्गी लावावा अशी मागणी भीमा पाटबंधारे विभागाच्या आधिकाऱ्यांनाकेली आहे. या बाबत त्यांनी मागणीचे निवेदन देखील दिले आहे.
या आपल्या मागणी संदर्भात माहिती देताना शिरसट यांनी सांगितले की, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिलेहोते. मात्र, आलेगाव खुर्द-भांडगाव येथे बंधाऱ्याच्या मागणीसाठी सुरूअसलेल्या आंदोलनामुळे अद्याप प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळेशहरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून जनतेचे हालहोण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये आणि पंढरपूरकरांना दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या पंढरपूरकरांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडेलागले असून, पाणी प्रश्नावर तातडीने तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्षआहे.
—————-
चौकट : ( २०१७ सालची आठवण )
या पार्श्वभूमीवर भाजपचे माजीशहराध्यक्ष तसेच पंढरपूर नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट यांनीपुढाकार घेत पुन्हा एकदा २०१७ सालची आठवण करून दिली आहे. मे २०१७ मध्येही शहरात अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पाणीपुरवठा सभापती म्हणूनकार्यरत असलेल्या विक्रम शिरसट यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत उजनी कालव्यातीलगादेगाव येथून पाणी बंधाऱ्यात सोडण्याची व्यवस्था करून पंढरपूर शहराचापाणीप्रश्न तात्पुरता मार्गी लावला होता. आता पुन्हा त्याचप्रमाणे परिस्थितीनिर्माण झाल्याने विक्रम शिरसट यांनी भीमा पाटबंधारे विभागाकडे निवेदन देऊनतातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे.


















