सोलापूर – हुतात्मा एक्स्प्रेस ला हडपसर येथे थांबण्यासाठी, कोल्हापूर हायकोर्ट झाल्यामुळे कुलबुर्गी – कोल्हापूर गाडीची वेळ बदलावी, वंदे भारत मुंबई-सोलापूर एक्स्प्रेस सोलापूर आगमन झाल्यानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावर चार नंबर प्लॅटफॉर्म थांबण्याऐवजी एक नंबरवर थांबवावी व सोलापूर नागपूर वंदेमातरम एक्स्प्रेस मिळावी अशी मागणी मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य गणेश डोंगरे मुंबईतील बैठकीत केली.
गुरुवारी क्षेत्रीय रेल उपयोग कर्ता परामर्शदात्री समिती 127 वी बैठक मध्य रेल्वे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत खा. प्रणिती शिंदे यांनी सुचविलेल्या सोलापूर-मुंबई सिध्देश्वर एक्स्प्रेस मोहोळ येथे थांबण्यासाठी रेल्वेमंत्री यांना केलेला पाठपुरव्यामुळे व 126 व्या बैठकीत मांडलेल्या प्रश्नावरून मोहोळ येथे थांबा मिळाला यासाठी रेल्वे प्रशासनाचे आभार मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य गणेश डोंगरे यांनी मानले.



















