Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा

तरुण भारतbyतरुण भारत
April 25, 2026
in editor
0
महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महावितरण कंपनीने वीज कंत्राटी कामगारांना पूर्वीप्रमाणेच बोनस व रजेचे वेतन दरमहा अदा करण्याचा निर्णय परिपत्रक काढून घेतला. ही बाब राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मीती मधील वीज कंत्राटी कामगारांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारी असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने( संलग्न भारतीय मजदूर संघ ) या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महावितरणच्या औद्योगिक संबंध विभागाने दि.21 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर 2025 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीतील बोनस व रजेचे वेतन एकत्रितरित्या ऑक्टोबर 2026 महिन्यात देण्याची पद्धत लागू करण्यात आली होती. मात्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) व सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत निर्धारित वेतन मर्यादा रकमेच्या व्याख्येत बदल झाल्यामुळे आता पुन्हा वीज कंत्राटी कामगारांना दरमहा वेतनात बोनस व रजेचे वेतन समाविष्ट करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने या बाबत प्रशासन,केंद्र सरकार, राज्य सरकार व ई.एस.आय कडे मागणी केली होती. तसेच नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री मा.ना.मनसुख मांडवीय यांच्या समवेत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी ESIC वेतन मर्यादा वाढवणे बाबत आग्रही मागणी केली होती . 

नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीतील थकीत बोनस व रजेचे वेतन माहे मे 2026 च्या वेतनात समाविष्ट करून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून कपात झालेली प्रलंबित रक्कम सर्व वीज कंत्राटी कामगारांना परत मिळणार आहे.

संघाच्या पाठपुराव्यामुळे व सातत्यपूर्ण संघर्षामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले.

संपर्क पोर्टलवर कोर्ट केस कामगारांची नावे स्पष्ट दिसतील प्रमुख नियोक्त्याच्या लेखी सुचने शिवाय कंत्राटदार कामगार कपात करणार नाही, दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल असे आश्वासन गुरुवार दि.16 एप्रिल रोजी राज्य ऊर्जामंत्री मा.मेघना दीदी बोर्डीकर यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत MSEB होल्डिंग कंपनी संचालक मा.विश्वास पाठक, महावितरण चे संचालक (मा. सं) मा.राजेंद्र पवार व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी दिले.अध्यक्ष निलेश खरात यांनी आभार मानले. या बैठकीला सागर पवार , उमेश आणेराव, राहुल बोडके, अरुण पिवळं व प्रशांत भाम्बुर्डेकर उपस्थित होते.

भारतीय मजदूर संघाचा 16 एप्रिल रोजी मुंबई बांद्रा येथे राज्य व्यापी कामगार आक्रोश मोर्चा झाला या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळा सोबत बैठक होणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष मा.अनिल ढुमने यांनी दिली.

Post Views: 31
Previous Post

कोंढेजचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर सर करून रचला इतिहास

Next Post

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

ताज्या बातम्या

भाजपात गेले राघव चढढा #marathinews #viral

April 25, 2026

तडीपार गुंडाने केली विद्यार्थ्याला मारहाण..

April 25, 2026

सोलापुरात ड्रग्स माफीयांचा पर्दाफाश

April 25, 2026
जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

April 25, 2026

तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याला ५ वर्षे प्रवेशबंदी

April 25, 2026

८३ पैकी ५२ बाल मातांचे वय १८ वर्षे

April 25, 2026

मुंबईसाठी मे महिन्यापासून केवळ दोन दिवस विमानसेवा

April 25, 2026

सोलापूर शहरात आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरु

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0829002

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697