जेऊर – करमाळा शहरातील कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यशकल्याणी संस्थेकडून अबॅकस ग्रॅज्युएट विद्यार्थिनींना प्रत्येकी ₹3000 ची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. नॅशनल अबॅकस परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून 8000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी कमलाई प्रो ऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या एकूण 32 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला.
या परीक्षेत कमलाई क्लासेसची कु.ईशानी अमोल गायकवाड (इयत्ता पहिली) हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच लहान गटात वैभवी औदुंबर माकुडे हिने दुसऱ्या फेरीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला.
कमलाई क्लासेसच्या 32 विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी दाखविली.या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार, दि. 24 एप्रिल रोजी यशकल्याणी सेवा भवन करमाळा येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पंचायत समिती गटविकास अधिकारी अमित कदम, नामसाधना न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल चे संपादक शंभूराजे जगताप, प्रफुल्लता सातपुते, थोरात मॅडम सुनंदा माने जाधव सह बिनवडे गुरुजी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील हे उपस्थित होते.या कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन सौ. मंजुश्री मयूर मुसळे (संचालिका, कमलाई प्रो ऍक्टिव्ह क्लासेस, करमाळा), सौ. सारिका पुराणिक, श्रेया चव्हाण, श्रावणी क्षीरसागर, ईश्वरी पुराणिक, मधुरा मुसळे व मानव मुसळे यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय शिंदे सर यांनी केले.





















