सोलापूर – पुंडलिक पाटील क्लबच्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत येथील समाज कल्याण केंद्र लॉन टेनिस क्लबच्या चौघांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अजिंक्यपदे पटकाविली. दोघांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शौर्य बेंद्रे, रिषिकेश चव्हाण, यशवंतराजे पवार व रुद्रप्रताप चव्हाण यांनी अनुक्रमे १०, १२, १४ आणि १६ वर्षाखालील अशा विविध वयोगटांत ही कामगिरी केली. समाज कल्याण केंद्र क्लबचे संगमनाथ नागोजी तसेच मुख्य प्रशिक्षक सुधीर सालगुडे आणि पूजा सालगुडे यांनी सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे विशेष कौतुक केले.
अंतिम निकाल : १० वर्षाखालील: शौर्य बेंद्रे विजयी विरुद्ध अविनाश बाबलादी ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ७-०.
१२ वर्षाखालील : रिषिकेश चव्हाण विजयी विरुद्ध अयान बोल्ली ६-४.
१४ वर्षाखालील : यशवंतराजे पवार विजयी विरुद्ध वीर गायकवाड ६-१.
१६ वर्षाखालील मुले: रुद्रप्रताप चव्हाण विजयी विरुद्ध अमन लदाफ याचा ६-३.





















