अकलूज – विश्वातील प्राणीमात्राच्या कल्याणासाठी सद्धमाचा कल्याणकारी मार्ग दाखवणारे महाकरुणी तथागत भगवान बुद्ध यांच्या 2570 व्या जयंतीनिमित्त अकलुज येथील सारनाथ बुध्द विहारात परीसरातील हजारो बौध्द अनुयांयीनी अभिवादन केले.सायंकाळी अकलुज शहरातुन भगवान बुध्द व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.
तथागत भगवान बुध्दाचा जन्म,ज्ञानची प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाखी पोर्णीमेला घडल्याने संपुर्ण जगात हा दिवस बौद्ध पोर्णीमा म्हणून साजरा केला जातो.अकलुज येथे बौद्ध पोर्णीमे निमीत्त सारनाथ बुध्द विहार येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात सकाळी बुध्द वंदना व सुत्तपठण घेण्यात आले.तदनंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,मा.आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील,मुख्याधिकारी सचिन पाटील,नगरसेवक सचिन देशमुख,मोहसीन शेख,मिलिंद कोतमिरे,राहुल लोंढे,विशाल मोरे,नाशिक सोनवणे,प्रियंका गायकवाड,मनिषा तिकोटे,जयश्री एकतपुरे,
मृदुला सुर्यवंशी,आदीनी तथागताच्या मुर्तीरुपास पुष्प अर्पन करुन अभिवादन केले.यावेळी उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, दादासाहेब मोरे,किरण धाईंजे,सुशांत गायकवाड,भारतीय बौध्द महासभाचे दिलीप वाघमारे, बाळासाहेब गायकवाड,नागेश लोंढे,संतोष पाटील,गणपत जाधव,प्रल्हाद गायकवाड,प्रविण लोंढे,
आदीसह बहुसंख्येने बौध्द उपासक उपस्थित होते.
सायंकाळी अकलुज येथे भगवान बुद्ध व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत बहुसंख्य बौध्द अनुयांयी सहभागी झाले होते.बौध्द पोर्णिमेच्या निमित्ताने खिरदान व भोजनदान करण्यात आले होते.
बौध्द पोर्णीमे निमित्त भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्हा पश्चिम विभाग व माळशिरस तालुका शाखेच्या वतीने आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुज- शंकरनगर येथील संस्थेच्या कार्यालयात कार्यालय परीसरात 2570 मेनबत्या एकाच वेळी प्रज्वलीत करुन दिपोत्सव साजरा करण्यात आला होता.























