वळसंग – तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री शंकरलिंग कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.४७ टक्के लागला असून या परीक्षेत एकूण ४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६ विद्यार्थी प्रथम श्रेणी १३ विद्यार्थी द्वितीय श्रेणी आणि १९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत असे ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात कुमारी अलिषा शफिक अमलीचुंगे हिने ७३% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक, कुमारी प्राजक्ता दिलीप माने हिने ७१% टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक, तर कुमारी महेक फकीर अहमद बागवान हिने ७०.१७% टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापक संतोष शिंदे, शरणय्या मसुती, प्रतिभा तांडुरे यांचे संस्था अध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे, संचालक विश्वनाथ थळंगे, रामेश्वर बिज्जरगी, शिवशरण प्याटी, प्रकाश दुधगी, रमेश दुधगी मल्लिनाथ थळंगे, संजय दुधगी, चंद्रशेखर दसमाने, सिद्धाराम बागलकोटी, शंकर केशेट्टी, प्राचार्य वीरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके या सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



























