सोलापूर – ओकिनावा ट्रॅडिशनल कराटे अकॅडमी इंडियातर्फे कर्णिक नगर व पद्मा नगर सोलापूर येथे पार पडलेल्या 26 व्या ज्युनियर कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये मयुरेश नरसय्या गुंटूक याने उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम क्रमांकांची ट्रॉफी पटकाविली. ओंकार शाम साखरे याने द्वितीय तर सुनाक्षी राजशेखर माळी हिने तृतीय क्रमांकांची ट्रॉफी संपादिली.
याचा समारोप क्रीडा अधिकारी क्रांती बनकर तसेच माजी सैनिक ईरन्ना धनशेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ओंकार साखरे, शिवप्रिया येलदी यांनी शिबिरातील प्रशिक्षणाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. दररोज सलग 8 तास चालणाऱ्या या शिबिरात कराटे,ज्यूदो, सेल्फ डिफेन्स, जिम्नॅस्टिक, योगासने, ध्यान-प्राणायाम, हॉर्सरायडिंग, लाठीकाठी, नानचाकू,विविध अडथळा पार करणे, परेड,नेमबाजी, रोप व रॉक क्लायम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग, बौद्धिके आदी प्रकारचे शोर्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर शिबिरात
सर्वांना मुख्य प्रशिक्षिका/आंतरराष्ट्रीय पंच शिहान अनुराधा महादेव थोरात (ब्लॅक बेल्ट फिफ्थ डिग्री ), सोनिया सतीशकुमार थोरात, समर्थ जाधव, विराज बोकडे,सुजीत बिराजदार, वीर सुरा, यांचे मार्गदर्शन लाभले.
























