पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील प्रतापसिंह विद्यालयातून अनिकेत पांडुरंग मगर याने फेब्रुवारी_ मार्च 2026 मध्ये दहावीची बोर्ड परीक्षा पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील केंद्रातुन दिली होती .
या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला यामध्ये अनिकेत याला सर्वच विषयात प्रत्येकी 35 गुण मिळाले असून त्याला दहावीला 35 टक्केच गुण मिळाले आहेत .खरेतर सर्वच विषयात 35 गुण मिळविण्याची ही एक अनोखी किमयाच म्हणावी लागेल किंवा हा दुर्मीळ असा योगायोग म्हटले तरी वावगे ठरणार नाही .त्याला मराठी ,इंग्लिश, हिंदी, गणीत, विज्ञान, समाजशास्त्र या सर्वच विषयात पस्तीस गुण मिळाले आहेत.
पिलीव केंद्रात खरेतर अशी मार्क्स मिळण्याची पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे .अनिकेतला मार्क्स कमी असुदया पण त्याने हा दुर्मीळ योगायोग साधला आहे .
























