वेळापूर – सोहम वैशाली नामदेवराव शेंडे याने यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये ७५ व्या क्रमांकाने परीक्षेमध्ये यश संपादन केले. भारतीय वनसेवा अधिकारी म्हणून त्याची निवड होणे ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
लोकविकास शिक्षण संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर यांच्या भगिनी वैशाली शेंडे यांचे हे सुपुत्र असून सध्या फलटण तालुक्यामध्ये कोळकी या ठिकाणी राहत आहेत. बनकर कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब आहे.
संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर, सचिव चंद्रकांत नवले, सोमनाथ बनकर आनंद बनकर भागवत गायकवाड , मुख्याध्यापक सुनील पताळे अमोल पांढरे अजित बनकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या























