सोलापूर – विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्ती कृती समिती यांनी अकृषि विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, विद्यापीठातील उर्वरित शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सातवा वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण अदा करणे व अन्य न्यायिक प्रलंबित मागण्याबाबत तात्काळ व ठोस निर्णय न झाल्यास टप्याटप्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्रान्वये कळविले आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मचारी यांनी ही दि. १४ मे २०२६ पासून टप्याटप्याने आंदोलन पुकारले आहे. सदर आंदोलनात संघटनेचे सर्व सभासद सहभागी होणार आहेत. त्यानुसार आज विद्यापीठाचे मा.कुलगुरु, प्र-कुलगुरु व कुलसचिव यांना पुअहो सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, कास्ट्राईब संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना व आॅफिसर्स फोरम यांच्या वतीने संयुक्तरित्या सविस्तर निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुनिल थोरात, रवी शिंदे, प्रशांत चोरमले , रविकांत हुक्केरी, संतोष क्षिरसागर, भागवत घंटे, कांचन आघाव, उज्वला दंतकाळे , रवी हिप्परगी, अरविंद कोळेकर, किरण कराळे , यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.



























