अकलूज – उत्तर प्रदेशातील रस्ते व हा शक्तिपीठ महामार्ग, याच्या खर्चाची तुलना केली असता शिवाय या रस्त्याची सुरुवात व शेवट पाहता शासनाला यामध्ये किमान ४० हजार कोटी रुपये मिळणार असल्याचा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही,हा शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येत या रस्त्याचे मोजणीला विरोध करा असे उदगार आमदार रोहित पवार यांनी काढले.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या निमगाव ता.माळशिरस येथील सर्व पक्षीय शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार उत्तमराव जानकर,पंचायत समिती सभापती दत्ता मगर,भाजप नेते के के पाटील, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे,अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष गिरीश फोंडे ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, ॲड लक्ष्मण मगर,
या महामार्गाचे बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणतीही गरज अगर कुणाची मागणी नसताना होऊ घातलेला नागपूर गोवा हा शक्तिपीठ महामार्ग करताना शासनाने सर्व शेतकरी व त्यांच्या लोक प्रतिनिधींना गृहीत धरून केला आहे,या पैशातून लोकांच्या गरजेची विकासाची कामे झाली असती तरी आपण त्याचे स्वागत केले असते.
तुम्ही पहिल्या चार काठ्या झाल्या तर पुढच्या काठ्या झेलण्यासाठी आम्ही येऊ अशी या बाधितांना ताकद देतानाच लोकांना हे खाऊ नका,ते करू नका म्हणणाऱ्यानी स्वतःच्या कार्यक्रमातील विमाने उडवणे थांबवले पाहिजे,महाराष्ट्रातील भ्रष्टाचार अगोदर आवरला पाहिजे असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचा ही समाचार आ. रोहित पवार यांनी घेतला.
पुढे बोलताना आ पवार म्हणाले की,कोणत्याही विकास कामाला आमचा विरोध नाही मात्र त्यासाठी बाधित लोक किमान त्यांच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे आहे.मात्र शासन सर्वानाच गृहीत धरून करत आहे हे चुकीचे आहे.
सन २०२३ साली आणलेल्या या ८०६ किमी लांबीच्या रत्याचा खर्च ५७ हजार कोटी होता तो पुढे ८६ हजार कोटी तर आता तो १ लाख १ हजार कोटीचा झाला आहे .याचा प्रती किलो मिटर १२० कोटी रुपयांचा खर्च आहे.
उत्तर प्रदेशात गडकरींनी ८ पदरी केलेल्या रस्त्याचा खर्च ७० कोटी प्रती किमी आहे.गडकरींनी उत्तर प्रदेशात या बाधित शेतकऱ्यांना २६ टक्के खर्च नुकसान भरपाई म्हणून दिला आहे तो आपल्याकडे १७ टक्के देण्याच्या हालचाली सुरू आहेत.या ऐवजी यातील २० टक्के रक्कम पाण्यावर खर्च केली तरी शेतकरी सुखी होईल.मात्र या रस्त्यातून शासनाला ४० हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.राज्यातील अनेक रस्ते ,मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांनी काय अवस्था आहे,आणि कोल्हापूर ते नागपूर अनेक रस्ते उपलब्ध असताना गरज नसलेल्या या रस्त्यावर सर्वसामान्य जनतेच्या करातून मिळालेल्या रकमेचा उतमात करत आहेत.त्यात ही कामे ही आंध्र व गुजराथ मधील ठेकेदारांना मिळणार आहेत,राज्यातील ठेकेदारांचे शासनाकडे एक लाख कोटी रुपये येणे असताना ही कामे पर राज्यातील ठेकेदारांना दिली जात आहेत.
जलजीवन च्या कामावर खर्च झालेल्या १० लाख कोटींपैकी ७ लाख कोटी रुपये खर्च पाईपावर झाला असून त्यातील ९० टक्के पाईप्स गुजराथ मधून आणल्या जात आहेत.
शासनाकडे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास,दवाखाने,रस्ते,शाळा बांधण्यास पैसे नाहीत व या महामार्गाला मात्र पैसे आहेत.
लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून जवळपास एक कोटी महिलांची नावे कमी केली असून टप्याटप्याने उरलेल्या महिलांची पण नावे कमी करतील.
पंतप्रधानांनी तेल व इतर खर्च तसेच सोने खरेदी बाबत केलेल्या आवाहनाबाबत बोलताना ते म्हणाले की लोकांना अडचणीतून बाहेर काढायचे काम सरकारचे आहे,एवढ्या मोठ्या नेत्याच्या आवाहनाचे स्वागतच केले पाहिजे मात्र त्यांचे पक्षाचे नेते पंतप्रधानांचे कार्यक्रमातच विमाने उडवतात,शेकडो मोटार सायकली नेऊन आंदोलन करतात,त्यांच्यावर आळा घातला पाहिजे शिवाय महाराष्ट्रातील एवढा मोठा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे.मात्र भविष्यात पेट्रोल,डिझेल च्या किमती वाढून त्याचा अनेक व्यवसायावर,उद्योग धंद्यावर परिणाम होऊन मंदी येऊ शकते,ती टाळण्यासाठी केंद्र सरकारने आपले परराष्ट्र धोरण बदलले पाहिजे,भारताचे व इराण चे अतिशय चांगले संबंध असताना दुसऱ्याचे ऐकून ते बिघडवल्याचा आरोप त्यांनी केला.
शासनाने या रस्त्याबाबत ५ मे ला अधिसूचना काढली तेंव्हा शेतकऱ्यांना कुठे आपले गट नंबरची माहिती झाली.मात्र भोंदू बाबा अशोक खरातला मात्र कुणीतरी शासनातील प्रतिनिधीने माहिती दिल्यानेच त्याने या मार्गावर अगोदरच ११ एकर जमीन खरेदी करून ठेवली आहे.स्वतः चे भविष्य माहीत नसणाऱ्याला शासनातील प्रतिनिधी मुळे हे भविष्य कळाले.
अजित दादांच्या विमान अपघात चौकशी साठी संघर्ष करणार
अजित दादा हे माझे काका व आमचे नेते होते,त्याबद्दलच्या तक्रारीचा एफ आय आर ही पोलिसांनी नोंदवून न घेतल्याने मला परराज्यात तो नोंदवावा लागला.तर तो हे शासन स्वीकारत नाही,त्यावेळी प्रोटोकॉल बाजूला ठेवला गेला,सुनेत्रा काकीनीही काळजी घेतली पाहिजे.
हनुमंत पवार यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले तर ब्रम्हदेव मगर यांनी आभार मानले.



























