सोलापूर – येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व संभाजी आरमार संघटनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी आरमार संघटनेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले व भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, आ. विक्रांत पाटील, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, नगरसेवक तथा कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, संभाजी आरमार शहराध्यक्ष सागर ढगे यांच्यासह अन्य मान्यवर संभाजी आरमार चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























