सदाशिवनगर – तालुक्यातील पळसमंडळ,सुळेवाडी व पिंपरी या तीन गावांना तटकरणे पाणी पुरवठा केला जाणार असून आज सदरचे टँकर त्या त्या गावांना रवाना केल्याची माहिती पंचायत समितीचे पाणी पुरवठा उपअभियंता जे .व्ही सदावरे यांनी सांगितले .यावेळी शाखा अभियंता ए.एन,आंबले,जे व्ही .घोळवे,वरिष्ठ सहाय्यक एस .आर,करांडे.सहा.स्थापत्य अभियंता एस आर मोरे आदी उपस्थित होते
पळसमंडळ येथील फडतरीवस्ती ,चव्हाणवस्ती,माने साळुंखेवस्ती,पाडुळे भाळेवस्ती ,करे वस्ती,शिंदे वाघमोडे वस्ती या सहा वस्त्यावर २५ हजार ली क्षमतेच्या टँकरच्या चार खेपा दररोज करण्यात येणार आहेत
सुळेवाडी येथील इरकर वस्ती,फुले वस्ती या दोन वस्त्यावर १० हजार ली क्षमतेच्या टँकरच्या दोन खेपा दररोज करण्यात येणार आहेत.
पिंपरी येथील खडकमाळ,लक्ष्मिनगर,हरणटेक वस्ती,गायरान वस्ती,बाळूमामावाडी,बजबळकर वस्ती,उंबरदेव,बाडवस्ती ,दत्तनगर ,दत्ताडेवस्ती ,राणे वाडी ,लांडीवस्ती,कोथळवाट,या १३ वस्त्यावर २४ हजार ली क्षमतेच्या तटँकरच्या रोज तीन खेपा दररोज करण्यात येणार आहेत .
गतवर्षी २५ मार्चलाच टँकर सुरू करावे लागले होते .गतवर्षी मे मध्ये १० टँकर सुरु होते .यावर्षी आज अखेर तीन टँकर सुरु करण्यात आले असून कदमवाडी गावाचा प्रस्ताव आला आहे.
फोटो… पळसमंडळ ला टँकर रवाना करताना पाणीपुरवठा अधिकारी,कर्मचारी


























