पंढरपूर – महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे मार्गीलावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरअभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अतंर्गत पंढरपूर तालुक्यातील चळे व तुंगत मंडळातून नुकतेच एक हजार ५२६ विविध सेवा व विविध दाखले देण्यात आले असल्याची माहित तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
या अभियाना अंतर्गत चळे व तुंगत येथील शिबिरात निकाली काढण्यात आलेले फेरफार १०८, सातबारा मधील दुरुस्ती १६, डिजिटल सातबारा ३८४, ८ अ उतारे ३१२, प्रमाणपत्रे ४६९, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज ०५, भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेली प्रकरणे १७, अद्यावत अभिलेख ५९, वर्ग दोन जमिन वर्ग एक करण्याबाबत कार्यवाही १६, सामाजिक योजना ४९, शिधापत्रिका ११, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना ५०, आभा कार्ड, एच.बी, तपासणी व औषधोपचार २०, ई- मोजणी फेरफार नकाशा १० आदी सेवा व दाखले देण्यात आले.
यामध्ये चळे मंडळातून ७३१ तर तुंगत मंडळातून ७९५ असे एकूण एक हजार ५२६ विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्याचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील संबधीत मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाराजस्व समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार लंगुटे यांनी केले आहे.
यावेळी आमदार अभिजीत पाटील,
जि.प.सदस्यगितांजली साळुंखे, पं.स.सदस्य अतुल गायकवाड, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, अमृता रणदिवे, प्रांताधिकारीसचिन इथापे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, दीपक शिंदे आदीसह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते.


























