सांगोला – आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपटराव देशमुख यांच्या निधनाबद्दल सांगोला शहरातील चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोपटराव देशमुख यांचे बालपण सांगोला येथे गेले होते. श्रद्धांजली सभेदरम्यान मंडळाच्या सदस्यांनी त्यांच्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी डॉ. कृष्णा इंगोले, प्रा.राजेंद्र ठोंबरे, म.श.घोंगडे, गजानन दीक्षित, हेमंत तेली, जयंत तेली, भारत राऊत, इसाक काझी, अरविंद डोंबे, अशोक जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष देशमुख, भागवत पैलवान, सुधीर दौंडे, जयसिंग खडतरे, सुभाष महिमकर, नारायण विसापूरे, प्रा.बाळासाहेब वाघमारे, भीमाशंकर पैलवान, इंजि.भारत शिवशरण, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, अरुण कुलकर्णी, गंगाधर देशपांडे, सुधाकर म्हेत्रे, बाबुराव लाडे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.


























