महापालिकेत नगरसेवक – नगरसेविकांना ओळखपत्र व बॅच बिल्ल्यांचे वितरण
सोलापूर : महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते तर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तसेच सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिकेतील उपस्थित नगरसेवक व नगरसेविकांना अधिकृत ओळखपत्र तसेच बॅच बिल्ल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवकांना त्यांच्या पदाची अधिकृत ओळख दर्शविणारे ओळखपत्र आणि बॅच बिल्ले प्रदान करण्यात आले. यामुळे महानगरपालिकेच्या विविध बैठका, कार्यक्रम तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये लोकप्रतिनिधींची ओळख अधिक सुलभ होणार आहे.
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, नगरसेवक हे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. ओळखपत्र व बॅच बिल्ल्यांमुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यास अधिकृतता व सुसूत्रता मिळणार असून नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल.
या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
Post Views: 13