Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेच्या स्टोअरमधून भंगार चोरीचा प्रयत्न; नगरसेवक अमोल शिंदे यांच्या सतर्कतेने प्रकार उघड

तरुण भारतbyतरुण भारत
May 19, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या मागील गेटजवळील स्टोअर रूम परिसरातून भंगार चोरीचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी उघडकीस आणला. या प्रकारामुळे महापालिका परिसरात मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
          महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या स्टोअर रूम मधून भंगार एका खाजगी गाडीमधून घेऊन जाताना नगरसेवक अमोल शिंदे यांनी आज दुपारी पकडला. त्यानी तात्काळ सभागृह नेते नरेंद्र काळे ,
 महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार यांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, सात्विक बडवे, विनायक विटकर, किरण पवार यांच्यासह नगरसेवक, उपअभियंता अविनाश वाघमारे, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे उपस्थित होते. सर्वांनी स्टोअर मधील माल घेऊन जात असलेली छोटा हत्ती गाडीची पाहणी केली. या प्रकरणामुळे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे चांगलेच संतापले. सदर बजार पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले. यावेळी सभागृह नेते  नरेंद्र काळे आणि नगरसेवक अमोल शिंदे यांनी योग्य चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
        अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून अतिक्रमित साहित्य जागेवरच निष्काशीत केले जाते. ते इथे आणले जात नाहीत. जप्त केलेले साहित्य आधार कार्ड पाहून दिले जाते. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी केली.
         मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या स्टोअर रूममध्ये विविध कारवायांमधून जप्त करण्यात आलेले भंगार साहित्य जमा केले जाते. सोमवारी सकाळी एका खासगी छोटा हत्ती वाहनातून हे भंगार भरून नेले जात असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने नगरसेवक अमोल शिंदे यांना दिली. त्यानंतर शिंदे घटनास्थळी पोहोचले असता वाहनात भंगार भरले जात असल्याचे दिसून आले. यावेळी संबंधित वाहन चालकासह भंगार भरत असलेले चार जण आणि काही कर्मचारी घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
साहित्य चोरीला जाणे ही अत्यंत
 लाजिरवाणी बाब : अमोल शिंदे
          याबाबत बोलताना नगरसेवक अमोल शिंदे म्हणाले, महापालिकेच्या स्टोअरमधील भंगार खासगी वाहनातून बाहेर नेले जात होते. आम्ही घटनास्थळी पोहोचताच संबंधित चार जण आणि काही कर्मचारी पळून गेले. परवानगी नसताना अशा पद्धतीने महापालिकेचे साहित्य चोरीला जाणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे.
सखोल चौकशी करून संबंधितांवर
 गुन्हे दाखल करा : नरेंद्र काळे
       दरम्यान, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही या घटनेला गंभीर स्वरूपाचे प्रकरण असल्याचे सांगितले. स्टोअरमधील स्क्रॅप खासगी वाहनातून नेताना पकडण्यात आले. वाहन, चालक आणि स्क्रॅप जागेवर आढळले. काही कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आर्थिक व्यवहारात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. कुणाचीही गय केली जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.तसेच, स्टोअर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही काळे यांनी सांगितले.
Post Views: 58
Previous Post

विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post

जिल्हा कुमार खो-खो स्पर्धा : अर्धनारी नटेश्वर क्लबला विजेतेपद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा कुमार खो-खो स्पर्धा : अर्धनारी नटेश्वर क्लबला विजेतेपद

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960508

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!