टेंभुर्णी – ता. माढा येथे चार दुकाने जळून खाक होऊन झालेल्या नुकसानीत जवळपास कोटभर रुपयांन पेक्षा जास्त नुकसान झाले असून नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे जीवीत हानी झाली नाही ही घटना मंगळवारी दि.१९ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि टेंभुर्णी येथील टेंभुर्णी- करमाळा रोड लगत असलेल्या पुष्पक मंगल कार्यालया शेजारील लगत असलेल्या गाड्यांमध्ये असलेल्या फर्निचर च्या दुकानत मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान भुस्याला आग लागली होती ती विझवताना सामान बाहेर काढल्यानंतर शेजारी असलेल्या हार्डवेअर दुकानाच्या बाहेर असलेल्या प्लॅस्टिक साहित्याने पेट घेतला दरम्यान वारे जोरात सुटल्याने आगीने रोद्र रूप धारण केले यामध्ये राऊत आणि आकाश सुतार यांची दोन फर्निचर ची दुकाने
व महेश तोडकर यांचे हार्डवेअर,व वैभव तोडकर इलेक्ट्रॉनिक्स दुकाने जळत होती यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे व इंदापूर नगरपरिषदेचे अग्निशामक दलाने आग विझविली तोपर्यंत चारी दुकानातील साहित्य जळून खाक झाले यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर चे एक कोटी रूपयांचे च्या पुढे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तसेच शेजारीच असलेल्या बारामती अर्बन बँकेच्या खिडकीतून ज्वाला आत जाऊन कागद पत्रांनी पेट घेतला होता.परंतु युवकांनी व कर्मचा-यांनी तातडीने सामान बाहेर काढले.ही घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
Post Views: 13