सोलापूर – दोन मालवाहतूक वाहनांची समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात कर्नाटक राज्यातील आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोलापूर पुणे महामार्गावर चिखली पाठीजवळ आज बुधवारी सकाळी सहा वाजता घडली.
व्यंकम्मा अंबना बागले (वय 50 वर्ष ) , सिद्धाराम अंबरनाथ तळवार ( वय 76 वर्ष ) , दीपा सिद्धाराम पवार (वय 15 वर्ष ) , साक्षी सिद्धाराम तळवार ( वय 12 वर्ष ) , अंबाकल बागले ( वय 60 वर्षे ) , अन्नपूर्णा सिद्राम तळवार ( वय 42 वर्ष ) , पूजा सिद्राम तळवार (वय 17 वर्षे ) आणि रघु कोळी (वय 38 वर्ष , सर्व राहणार कर्नाटक राज्य ) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. वरील सर्वजण आज बुधवारी सकाळी पुण्याहून सोलापूर कडे अशोक लेलँड चार चाकी वाहनाने येत असताना वाटेत चिखली पाठीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली . यात वरील सर्वजण मार लागून जखमी झाल्याने त्यांना एका रुग्णवाहिकेतून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी प्रदीप पाटील यांनी सकाळी आठ वाजता दाखल केले .
Post Views: 6