
सोलापूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्क अध्यक्ष ॲड किशोर शिंदे व ॲड सुधीर पाटसकर हे सोलापूर शहर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, या मतदारसंघातील आढावा घेतला. सोन्या मारुती चौकातील कार्यालयात असंख्य महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश झाला.
यावेळी बोलताना संपर्क अध्यक्ष एडवोकेट किशोर शिंदे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ताकद वाढविणारा असून आगामी काळातील सर्व निवडणुका जोमाने लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, प्रकाश कोळी, प्रसाद कुमठेकर, सुभाष माने, रोहित कलशेट्टी, मल्लिनाथ पाटील, श्रीधर गुड्डेली, जयश्री हिरेमठ, गोविंद बंदपट्टे, करुणा यादव,सागर जिडगी, ओंकार सोंडेकर, अनिकेत उपासे, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, इरेश करजगी आदी उपस्थित होते.






















