
पिलीव – माळशिरस तालुक्यात पिलीव परीसरातील सर्वच औषध विक्रेते आज आपल्या विविध मागण्यासाठी देशव्यापी संपात सहभागी झाले होते .आज सकाळपासून पिलीव येथील सर्व जवळपास 27 औषध विक्रेत्यांनी केंद्र शासनाकडुन प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे .यामुळेच आज एकदिवसीय संप पुकारला होता याला पिलीव परीसरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.2013 या वर्षी डिपीओ अंतर्गत जीवनावश्यक औषधावर होलसेलवर व रिटेलवर नफा निश्चित करण्यात आला होता परंतू कंपन्यांकडून 20 ते 40 टक्क्यांपर्यंत मोठ्या सवलती दिल्याने औषध विक्रेते अडचणीत आले आहेत. डाॅकटरांनी लिहुन दिलेल्या औषधाऐवजी औषध विक्रेत्यांना ब्रॅड सबटीटयुट औषधे देण्याचा अधिकार देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी पिलीव परीसरातील सर्वच औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात सहभागी झाले होते .यामुळे आज नागरिकांची मोठी गैरसोय झाली . फोटो _ पिलीव येथील बंद असलेले शिवरत्न मेडिकल.





















