सोलापूर – जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2026 सुरू होत असताना बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन सोलापूर सीड्स फर्टीलायझर्स अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
असोसिएशनचे सचिव श्री. बालाजीभाऊ चौगुले यांनी सांगितले की—
शेतकऱ्यांनी बियाणे किंवा कोणतेही कृषीInput खरेदी करताना खालील बाबींची विशेष दक्षता घेणे अत्यावश्यक आहे:
बियाण्याच्या पिशवीवरील कंपनीचे नाव, लॉट क्रमांक, लेबल क्रमांक, किंमत, जर्मिनेशन टक्केवारी, उत्पादन/अंतिम मुदत, प्रक्रिया पद्धती आदी सर्व माहिती तपासावी.
बियाणे, खते किंवा कीडनाशके खरेदी केल्यानंतर बिल, बॅग व टॅग जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
सोयाबीन पेरणीसाठी किमान 100 मिली पाउच व तदनुसार पेरणी प्रक्रिया काटेकोर पाळावी.
ट्रकद्वारे आलेल्या बियाण्याची जास्त हालचाल झाल्यास पेरणीत नुकसान होते, त्यामुळे खरेदीवेळी याची दक्षता घ्यावी.
बियाणे विक्रेत्यांनी बियाण्याची अंकुरण क्षमता, प्रक्रिया, उपचार, हमी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करणे आवश्यक आहे.
कीडनाशकांच्या वापरासाठी शिफारस केलेली नवीन औषधे व योग्य प्रमाण याची माहिती घ्यावी.
वाहतूक किंवा अयोग्य साठवणुकीमुळे बियाण्याचे नुकसान होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
तसेच पावत्यांद्वारे व्यवहार करणे आणि ऑनलाईन पेमेंटचे पुरावे जतन करणे अनिवार्य आहे.
शेतकरी बांधवांनी योग्य माहिती घेऊन, विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच बियाणे व अन्य कृषी साहित्य खरेदी करावे, असे आवाहन सोलापूर सीड्स फर्टीलायझर्स अँड पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 10