
सांगोला – येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला बुधवार दि.२० मे पासून सुरुवात झाली असून प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र ६४७१ ला मान्यता मिळाली आहे. ही प्रक्रिया सोमवार दि.२२ जून पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे.
विद्यार्थी दि.२० मे ते २२ जून या कालावधीत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे तसेच आपल्या प्रवर्गासाठी कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश अर्ज निश्चित करू शकतात. दि.२४ जून रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जात काही त्रुटी असल्यास दि.२५ ते ३० जून या दरम्यान दुरुस्त्या करून घेऊ शकतात. मंडळाच्या संकेतस्थळावर दि.२ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्यात येतील.
चौकट-
सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, जत, आटपाडी या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन संबंधित कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे सुविधा केंद्र असून याचा फायदा पालकांनी घ्यावा.
– बाबुराव गायकवाड, संस्थाध्यक्ष
Post Views: 28