
सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पुणे येथे होणाऱ्या सिनियर महिला निवड चाचणी कॅम्पसाठी येथील साक्षी वाघमोडे, आर्या उमाप, भक्ती पवार व स्नेहा शिंदे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पाच टी-20 निमंत्रित सामन्यांतील कामगिरीवर ही निवड झाली आहे. निमंत्रित सामन्यांमध्ये सोलापूर संघाकडून खेळताना आर्या उमापने 211, साक्षी वाघमोडेने 196 धावा केल्या होत्या. भक्ती पवारने 10 व स्नेहा शिंदेने 8 बळी अशी कामगिरी केली. पुढील निवड चाचणी कॅम्प पुणे या ठिकाणी होत आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, व्हा. चेअरमन श्रीकांत मोरे, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख व संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सु यांच्यासह स्नेहल जाधव, किरण मणियार, सारिका कुरुलकर व मानसी जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.






















