पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महामंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळातर्फे 28 ते 31 मे यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्सव अध्यक्ष मनीषा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मूर्ती स्थापना कार्यक्रम दि. 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता समाजाचे नगर सेवक व नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.29 ते 30 मे या कालावधीत मान्यवराच्या हस्ते अहिल्यादेवी मातेचे पूजन व दुग्धाभिषेक होणार आहे. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे,
खा. प्रणिती शिंदे, खा. ज्योती वाघमारे, आ. विजयकुमार देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. सुभाष देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच लोकप्रतिनिधींचा समावेश राहणार आहे.
29 मे रोजी महिलांचा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून 30 मे रोजी रात्री साडेदहा वाजता पाळणा कार्यक्रम होणार आहे. 31 मे रोजी जयंतीनिमित्त दुपारी चार वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये दहा ते बारा मंडळे सहभागी होणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा व्हावा, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी आंदोलनही करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला वैशाली सातपुते, सुमन मुदलीयार, किरण माशाळकर, निमिषा वाघमोडे, अर्चना बंडगर आदी उपस्थित होते.
चौकट
महामंडळ राबवणार विविध उपक्रम
जगातील विद्यार्थ्यांनी परिस्थिती तसेच महागाई लक्षात घेता यंदा जयंतीचा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मध्यवर्ती महामंडळातर्फे करण्यात आले.मंडळानी अन्नदान, झाडे लावा झाडे जगवा, विद्यार्थ्यांना शाळेस साहित्य वाटप आदी उपक्रम राबवावे असे आवाहन उत्सवा अध्यक्ष मनीषा माने यांनी केले आहे. महामंडळातर्फे महिलांसाठी र्ई -रिक्षा सेवा प्रशिक्षण व स्वयंरोजगार उपक्रम राबविण्यात येणार आहे. वर्षभरात आरोग्य, रक्तदान, मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. समाजातील महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय कामासंदर्भात तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर रविवारी मार्गदर्शन करणार आहोत.
=========================
आशा भोसले यांच्या स्मरणार्थ शनिवारी गायन कार्यक्रम
सोलापूर : महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग व नियंत्रण कार्यालय, सोलापूर उर्दू घर व भारतीय कला प्रसारक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या स्मरणार्थ शनिवार, दि. 30 मे रोजी
सायंकाळी 7 वाजता गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रख्यात गायक मोहम्मद अयाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात गायक मोहम्मद अयाज, आस्था लोहारे आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत संयोजन अविनाश इनामदार, साहिर नदाफ, अमिर हुंडेकरी यांचे राहणार असून सह-गायिका भाग्यश्री चव्हाण, डॉ. निलरोहित पैके व इतर प्रसिध्द कलावंतही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात स्व. आशा भोसले यांच्या सदाबहार, अवीट गाण्यांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणारआहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
या पत्रकार परिषदेला सोलापूर उर्दू घर सांस्कृतिक समितीचे प्रभारी व्यवस्थापक साहिर नदाफ आदी उपस्थित होते.
———————————————–
संत श्री ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवारातर्फे
अधिक मासनिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन
सोलापूर : जुनी पोलीस लाईन मुरारजी पेठ येथील संत श्री ज्ञानोबा तुकाराम भक्त परिवारातर्फे अधिक पुरुषोत्तम मास निमित्त 27 ते 31 मे या दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आदिनाथ जावळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुनी पोलीस लाईन येथील दक्षिणमुखी पावन मारुती मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. या कीर्तन महोत्सवअंतर्गत दररोज सायंकाळी सात वाजता कीर्तन होणार आहे. 27 मे रोजी ह भ प अक्रूर महाराज साखरे, 28 मे रोजी ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, 29 मे रोजी ह. भ. प. श्रीगुरु भागवत महाराज कबीर, 30 मे रोजी ह. भ. प. श्रीगुरु उमेश महाराज दशरथे, 31 मे रोजी ह भ प श्री गुरु कान्होबा महाराज देवकर यांचे कीर्तन होणार आहे.
या पत्रकार परिषदेला किसन कापसे, अनिकेत व्यवहारे, किरण पवार आदी उपस्थित होते.
======================
शंकर नरोटे फाऊंडेशनतर्फे गुरुवारी विविध कार्यक्रम
सोलापूर : शंकर नरोटे फाऊंडेशन, सोलापूर lतर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती समर्थ मोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जुनी मिल कंपाऊंड द स्क्वेअर मॉलसमोर होणार आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये धनगरी ढोल, हलगी वादन, धनगरी ओव्या, धनगरी नृत्य सुमारे 50 हून अधिक कलाकार सादर करणार आहेत. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 मूर्तींचे वाटप होणार आहे.
या पत्रकार परिषदेला गणेश गावडे, ऋतिक होनमाने, रवी लोमटे उपस्थित होते.
Post Views: 11