सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब चा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक व स्थायी समिती सदस्य सत्यनारायण गुर्रम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सारथी प्रीस्कूल चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
— प्रा सौ. श्रीलता जन्नू, प्रा.एस.आर. जडगे, श्री लेखराज कोनापूरे यांना ‘द बेस्ट इंग्लिश टीचर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
— सनी दौलताबाद, विनायक काकी, श्रीनिवास यन्नम, विठ्ठल कोंडा, पल्लवी आडकी यांचा विशेष योगदानाबद्दल ‘ द आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.
— सौ. प्रीती रंगदळ आणि अथर्व गणपा यांनी ‘द बेस्ट सारथीयन ऑफ द इयर’ पुरस्कार पटकावला.
क्लबच्या ३७ व्या एक्झिक्युटिव्ह बोर्डाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘द यंगेस्ट पुरस्कार’ ही देण्यात आले.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा परिचय राजश्री बाडद, प्रीती रंगदळ, आरती दुध्याल यांनी करून दिला.
या प्रसंगी पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आपली कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात सत्यनारायण गुर्रम यांनी सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लब च्या 21वर्षांच्या कारकिर्दीत असंख्य सोलापूरकरांना इंग्रजी संभाषण आणि सॉफ्ट स्किल्स विषयी मिळत असलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणाचा गौरवपूर्ण उल्लेख करत नव्याने सुरू होत असलेल्या सारथी प्रीस्कूलला शुभेच्छा दिल्या.
पद्मा आडकी, श्रीहरी आरकाल, आदित्य चौगुले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
संजीवनी श्रीराम आणि भास्कर सानम यांनी सूत्रसंचालन केले, क्लब संस्थापक प्रा. विठ्ठल वंगा यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
अध्यक्ष शिवलीला कुरणे यांनी आभार मानले.
यावळी प्रमोद कानडे, धनंजय धेंडे, सत्यनारायण वंगा, वेणी वंगा, रमेश कमटम, काशिनाथ कुंटला,चार्वाक बुर्गुल , नरसिंम्हा कनकी, श्रीनिवास नंदाल, परशुराम रापेल्ली ,गणेश इराबत्ती,सदानंद चिंता,यल्लादास लछमापुरे, सिद्राम कोनापूरे, सुजाता मुनकमपल्ली, गोवर्धन बडुगू,किसन आडम,
विजय कुंदन जाधव, काशिनाथ भातगुणकी ,प्रा.ए.एन.अन्नलदास, रवींद्र पानुगंटी आदी उपस्थित होते.
Post Views: 28