सोलापूर -येथील सिद्धेश्वर प्रशाल पायऱ्यावर एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आज बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आला.
प्रज्योत शशिकांत व्यवहारे (वय 30 वर्ष, रा.जुनीमिल चाळ ,मुरारजी पेठ, सोलापूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर प्रशालेच्या पायरीजवळ तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.याची माहिती फौजदार चावडीच्या पोलिसाना समजताच पोलीस हवालदार रुपनर यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दुपारी अडीच वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
मयत प्रज्योत व्यवहारे हा अविवाहित असून तो मजुरी करायचा. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 16