सोलापूर – चालत्या रेल्वे गाडीतून पडून एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन जवळ घडली. त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
सदर मयत प्रवासी हा मंगळवार रोजी कर्नाटक एक्सप्रेसने प्रवास करत असताना कुर्डुवाडी जवळ रेल्वेतून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला कुर्डुवाडी च्या सरकारी दवाखान्यात उपचार करुन कुर्डवाडी लोहमार्ग चे सहाय्यक फौजदार एम यस पाटील यांनी येथील शासकीय रुग्णालयात 26 मे रोजी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान आज बुधवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला.
Post Views: 18