नई जिंदगी येथे लिंबाच्या झाडाला केबल वायरने गळफास घेऊन एकाचे आत्महत्या
सोलापूर : अज्ञात कारणावरून एका 55 वर्षीय इसमाने घराजवळील लिंबाच्या झाडाला केबलच्या वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नई जिंदगी भागात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
बाळू श्रीराम जाधव (वय 55 वर्ष , रा. नई जिंदगी सोलापूर) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. मंगळवारी रात्री घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला .नातेवाईकांच्या सहाय्याने गळफास सोडवून मुलगा आकाश जाधव याने त्यांना उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित
केले .
तुला मुलीच होत आहेत – वंशाला दिवा नाही म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ – रायचूर येथील पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : तुला मुलीच होत आहेत , आम्हाला वंशाला दिवा नाही, मुलाचे दुसरे लग्न करू अशी धमकी देत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी रायचूर येथील पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पती- जगदीश म्हेत्रे, सासू- रंगमा म्हेत्रे, नणंद-जमुना म्हेेत्रे, नणंदेचा पती- दीपक म्हेत्रे, दिर- रमेश म्हेत्रे (सर्व रा. नंदेश्वर नगर, रायचूर राज्य-कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून याबाबत राधा जगदीश म्हेत्रे ( रा. इरण्णा वस्ती, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी दि.११ मे २०१८ रोजी ते दि. २२ मार्च २०२६ दरम्यान सासरी नांदत असताना वरील आरोपींनी घरातील किरकोळ कारणावरून फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास देवून मुलीच होत आहेत , आम्हाला वंशाला दिवा नाही. मुलाचे दुसरे लग्न करू अशी धमकी दिली. तसेच नणंदेने पतीस बरेवाईट शिकवून शिवीगाळ करून धमकी देवून मानसिक त्रास दिला. नणंदेचा पतीने अपशब्द वापरून शिवीगाळ करून त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार राठोड करीत आहेत.
Post Views: 15