सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विभागीय अधिकारी श्रीमती सुनीता हिबारे,मध्यवर्ती शिवजन्मोउत्सव ट्रस्टचे अध्यक्ष पद्माकर काळे, नगरसेवक विनोद भोसले , अंबादास शेळके,प्रकाश ननावरे, अंबादास सपकाळ विजय पोकळे,दादा सुरवसे, संदीप साळुंखे तसेच कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, माऊली पवार, श्रीनिवास रामगल, अजय क्षीरसागर,चंद्रकात दोतुल,श्री माने जयप्रकाश आमनगी, श्रीकांत घोलप,विशाल जाकंनदर,भास्कर सामलेटी सिद्धू तिमीगार, आदी मान्यवर उपस्थित होते.